Tahuli Fort (ताहुली)

Tahuli Fort  (ताहुली)
 Tahuli Fort  (ताहुली) 
Height of the fort: - 3487 feet
Type of fort: - Giridurg
Mountain Range: - Matheran
District: - Thane
Category: - Medium

This fort is in Kalyan, Karjat and Panvel sections. Immediately according to Tahuli Fort or fort. It is famous for its three cones. The difficult part of going to the tall, unbearable place is therefore typical and it is probably overlooked.


Places to see on the fort: - The monastery of Sant Gadge Baba Maharaj is on the plateau of Tahli. There are two more Ashrams on the way. The upper part of the plateau is called 'Dadima Tahuli'. There are five peers here. There is also a small house in the front. In the next two hours, when you walk a little further this way, you reach the rug of Tahuli. The name of the other one is 'Dawood' and the other is 'Baman'.


How to get to the fort: - There are two ways to go to Tahli.


From Ambernath - the second route goes from Ambernath. Ambernath went out and crossed the road of Badlapur. Within a short time there is a lake called Kakuli. At a distance from this Kakuli Lake, a hill trunk reaches three piers of Tahli. This route takes four hours to reach the Tahalu plateau.


 Kushiwali - Kalyan Mangalgad Road on the stop at Kushiwali village. Wheel is going straight from the village directly to the bullock cart. This route rises from the two-hill bellows. It takes two and a half hours to reach the plateau from Kushivali village.


 Accommodation Facility:- There is no accommodation facility available on the fort.


 Food Facility:- There is no facility for food on the fort.


 Water Facility: - There is no water available on the fort, so take away with water.


Time to travel: - Twenty two hours via Kushivali, four hours via Kakoli lake.


=================================================

किल्ल्याची उंची:- 3487  फुट
 किल्ल्याचा प्रकार: -  गिरिदुर्ग
 डोंगररांग:-  माथेरान
 जिल्हा:-  ठाणे
 श्रेणी:-  मध्यम

 कल्याण,  कर्जत व पनवेल या विभागात हा किल्ला आहे.  ताहुली ला किल्ला किंवा गड म्हणणे तसे आयोग्यच.  हा त्याच्या तीन सुळक्यांमुळे प्रसिद्ध आहे.   उंच,  बेलाग कडे जाण्याच्या अवघड वाटा यामुळे ताहुली वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि कदाचित यामुळेच दुर्लक्षित आहे.

 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-    ताहुली च्या पठारावर संत गाडगेबाबा महाराजांचा मठ आहे.  वाटेत आणखी दोन आश्रम लागतात.  पठाराच्या सर्वात वरच्या भागाला '  दादिमा ताहुली'  म्हणतात.  येथे पाच पीर आहेत.  समोरच एक छोटेसे घर देखील आहे.  याच वाटेने थोडे पुढे गेल्यावर दोन तासात आपण   ताहुलीच्या सुळक्यापाशी पोहोचतो.  एकास  सुळक्याचे नाव '  दाऊद'  असे आहे  तर दुसऱ्याचे नाव '  बामन'  आहे.

 गडावर जाण्याच्या वाटा: -   ताहुलीवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत.

 अंबरनाथ वरून - दुसरी वाट अंबरनाथ वरून जाते.  अंबरनाथ करून बाहेर पडून बदलापूरचा रस्ता ओलांडावा.  थोड्याच वेळात काकुली नावाचा तलाव लागतो.  या काकुली तलावापासून थोड्याच अंतरावर एक डोंगराची सोंड वर ताहुली च्या तीन सुळक्यांवर पोहोचते.  या वाटेने ताहुली पठार गाठण्यास चार तास लागतात.

 कुशिवली वरून -   कल्याण मंगलगड रोडवर कुशिवली गावाच्या स्टॉप वर उतरणे.  गावाच्या  बाहेरून थेट बैलगाडी जाईल एवढी मोठी  वाट   ताहुली ला गेली आहे.  ही वाट दोन डोंगरांच्या बेचक्यात मधून वर चढते.  कुशिवली गावापासून वर पठारावर जाण्यास अडीच तास लागतात.

 राहण्याची सोय:-  गडावर राहण्याची सोय नाही.

 जेवणाची सोय:-  गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही.

 पाण्याची सोय:-  गडावर पाण्याची सोय नसल्याने पाणी सोबत घेऊन जाणे.

 जाण्यासाठी लागणारा वेळ:-  अडीच तास कुशिवली मार्गे,  चार तास काकोली  तलावामार्गे.


SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment