Shirgaon Fort (शिरगावचा किल्ला)

Shirgaon Fort (शिरगावचा किल्ला)
Shirgaon Fort (शिरगावचा किल्ला)
The height of the fort: -
Types of fort: - Forts on the seashore
Mountain Range: - Konkan
District: - Thane
Category: - Simple

 Shirgaon fort is located five kilometers to the north of Mahim in Palghar taluka. Shirgaon fort is beautiful and the beach is beautiful, because the fort is neglected and the sea is deserted.


 History: - 173 9 Marathas won this fort along with the forts of Dahanu, Kelve and Tarapur. The Portuguese had possession of this fort before Maratha. Later in the eighteenth century, like the other forts, the fort went to the British.


 Places to see on the fort: -


 Shirgaon fort is roughly two hundred feet long and 150 feet wide. However, the wall of the fort is 35 ft tall and 10 feet wide. There are four bastions at the four corners of the fort and at the entrance there is also a tower. Above the entrance there is a very nice building wall. This chabutara reminds us of Samadhi of Maharaj at Raigad. On the walls of the fort, there are stairs on the outskirts of the fort, but to go to the bastion, steps have also been made through the walls of the fort. Although these step-by-step steps are not currently in use, these steps can be seen from the basement windows. There is another door on the western wall of the fort. But now it's completely closed. The west side of the fort shows the bird's eye view.


 To reach the fort: - The last station on Western Railway is Virar. To proceed with Virar, catch mail or shuttle and get to Palghar. Upon reaching Palghar, the bus running on Satpati route is half half hours. Taking this bus, we have to step down at the mosque stop. This distance is 15 minutes by bus. Besides, there are also auto-rickshaws coming to Palghar and going to this stop. After walking for 10 minutes at the Masjid stop, we come to the fort. There is a school adjacent to the fort.


 Accommodation Facility: - The entire fort is seen in half an hour. So there is no need to live However, if there is a need, accommodation can be arranged in the adjacent school of the fort.


 Dining facilities: - Palghar has many good hotels.


 Water Facility:-  There is no facility for drinking water on the fort.


=====================================================================


 किल्ल्याची उंची:-
 किल्ल्याचा प्रकार:- सागर किनाऱ्यावरील किल्ले
 डोंगररांग:-  कोकण
 जिल्हा:-  ठाणे
 श्रेणी:-  सोपी

 शिरगावचा किल्ला पालघर तालुक्यात  माहीमच्या उत्तरेला पाच किलोमीटर अंतरावर आहे.  शिरगावचा किल्ल्या पाठचा समुद्रकिनारा अत्यंत सुंदर असून किल्ला तसा दुर्लक्षित असल्याने समुद्र  किनाराही  निर्मनुष्य असतो.

 इतिहास:-  १७३९ झाली मराठ्यांनी हा किल्ला  डहाणू,  केळवे,  तारापूर  या किल्ल्यांबरोबर जिंकून घेतला.  मराठ्यांच्या आधी  या किल्ल्याचा ताबा  पोर्तुगीजांकडे होता.  नंतर अठराशे अठरा मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणेच  हा किल्ला  पण  इंग्रजांकडे गेला.

 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:- 

 शिरगावचा किल्ला साधारणतः दोनशे फूट लांब व 150 फूट रुंद इतक्याच आकाराचा आहे.  मात्र किल्ल्याची तटबंदी 35  फूट उंच  व 10  फुट  रुंद आहे.  किल्ल्याच्या चार कोपऱ्यात चार बुरुज असून प्रवेशद्वाराजवळ  सुद्धा एक बुरूज आहे.  प्रवेशद्वाराच्या वर एक अत्यंत सुबक बांधणीचा   चबुतरा  आहे.  हा चबुतरा  आपल्याला रायगडावरील महाराजांच्या समाधीची आठवण करून देतो.  येथील  तटबंदीवर,  बुरुजावर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणार्‍या तटबंदीच्या बाहेरून पायर्‍या असल्या तरी बुरुजांवर जायला तटबंदीच्या अंतर्भागातून सुद्धा पायर्‍या केलेल्या आहेत.  अर्थात आतुन जाणार्‍या पायर्‍या सध्या वापरात नसल्या तरी बुरुजाला असलेल्या खिडक्यांमधून आपल्याला या पायऱ्या दिसतात.  किल्ल्याच्या पश्चिमेकडील तटबंदी त  आणखी एक दरवाजा आहे.  मात्र आता तो पूर्णपणे बंद केलेला आहे.  किल्ल्याच्या तटबंदीवरून पश्चिमेकडे असणार्‍या समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य दिसते.

 गडावर जाण्याच्या वाटा:-  पश्चिम रेल्वे कडील शेवटचे स्टेशन म्हणजे विरार.  विरारच्या पुढे जाण्यासाठी मेल अथवा शटल पकडावी  व पालघरला उतरावे.  पालघरला पोहोचल्यावर तेथून  सातपाटी मार्गावर धावणार्‍या बस अर्ध्या अर्ध्या तासाने आहेत.  या बस पकडून आपल्याला मशीद स्टॉप वर उतरावे लागते.  हे अंतर बसने 15  मिनिटांचे आहे.  याशिवाय पालघर होऊन या स्टॉप ला यायला रिक्षा सुद्धा आहेत.  मशिद स्टॉपवरून दहा मिनिटे चालल्यावर आपण किल्ल्यापाशी येतो.  किल्ल्याला लागूनच एक शाळा आहे.

 राहण्याची सोय:-  संपूर्ण किल्ला अर्धा-पाऊण तासातच बघून होतो.  त्यामुळे राहण्याची गरज नाही.  मात्र तशी गरज भासल्यास  किल्ल्याला लागूनच असलेल्या शाळेमध्ये  राहण्याची सोय होऊ शकते.

 जेवणाची सोय:-  पालघरला अनेक चांगली हॉटेल्स आहेत.

 पाण्याची सोय:-  गडावर पिण्याच्या पाण्याची काहीच सोय नाही.
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment