Kohojgad Fort (कोहोजगड)

Kohojgad Fort (कोहोजगड)
Kohojgad Fort (कोहोजगड)
Height of the fort: - 3200 feet
Type of fort: - Giridurg
Mountain Range: - Palghar
District: - Thane
Category: - Medium

On the way to Mumbai towards Mumbai, Thane district's Palghar section is located. Many small fortresses in this area are still maintaining their existence. Of these, Kohoj is the main fort on the Vada Palghar road. This fort, situated just 10 to 11 kilometers from the fort, is very old.

History: - There is not much history of this fort available. It seems to be quite old from the rocky cisterns, but there is no proof. At the beginning of the sixteenth century the Portuguese conquered this territory by the king of Gujarat and raised the bastions on this fort. Later, Peshwa conquered this region in the eighteenth century campaign and finally went to the British.

 Places to see on the fort: - There was no need to surprise because of not being able to come up with a large plateau above Machi. In front of the machi there is a temple dedicated to Lord Shiva. There are two pockets in front of him but he has got spoiled. If you stand facing the temple, after narrowing down the left hand, there are seven wells digging each other. One of these ponds is very beautiful. The two tables are damaged and the rest are still bad.
Some ruined remains are found on the right side of the temple. At some places there is a splendid fortification. Moving on the left hand of the temple or going ahead, we can see the way to the right. Upon climbing right upwards, there are three spacious water tankers on the right side. One of them is boiled and the rest is marmalade, but it is also potable. Here is an open idol of Maruti in the corner. After moving towards the opposite direction, we went near the damaged bastions. There is a small Maruti temple on the left. In just about fifteen minutes, the steps are going on the top of the fort. There are two cones made of wind on the forehead, the shape of the man made of nature is the only indescribable art of nature. That's the most surprising thing. It is surprising to see the action of different shapes and emotions from different directions. Here is a small temple of Krishna, which has an eye on the eyes. The lower castle road looks nice, but the only thing that gets destroyed is that the temples are not only on the rocks but also on the statue, people have dishonored their names.

Accommodation Facility:- There is no shelter on the fort, only two people can live in the temple of Lord Shiva.

Food Facility:- It is only for drinking purpose that drinking water is on the fort.

Water Facility: - It is possible to have perennial water

Time to go: - Two hours.

========================================================================

किल्ल्याची उंची:- ३२०० फूट
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांग:- पालघर
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
मुंबईच्या उत्तरेस गुजरातकडे जातांना ठाणे जिल्ह्याचा पालघर हा विभाग लागतो.  या परिसरात अनेक लहान मोठे गडकिल्ले अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहेत.  यापैकी वाडा पालघर रस्त्यावरचा कोहोज हा प्रमुख किल्ला.  वाड्यापासून अवघ्या 10 ते 11 किलोमीटरवर वसलेला हा किल्ला बराच जुना आहे.

इतिहास:- या किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.  गडावरच्या  खोदीव टाक्यांवरून हा गड बर्‍यापैकी जुना असावा असे वाटते पण यास पुरावा नाही.  सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला पोर्तुगीजांनी गुजरातचा राजाकडून हा प्रदेश जिंकून घेतला व या गडावर तट बुरुज चढवले.  पुढे पेशव्यांनी अठराव्या शतकात काढलेल्या मोहिमेत हा प्रदेश जिंकला शेवटी तो इंग्रजांकडे गेला.

 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-  माची वरचे विस्तीर्ण पठार वाटेने येताना अजिबात न जोखता  आल्याने आश्चर्यचकित व्हायला होते.  माचीवर समोरच शंकराचे जिर्णोद्धारीत मंदिर आहे.  त्याच्या समोरच दोन टाकी आहेत पण ती खराब झालेली आहेत.  मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताला थोडे खाली उतरून गेल्यावर एकमेकांना लागून खोदलेली सात टाकी आहेत यापैकी एका टाक्याचे पाणी अतिशय सुंदर आहे.  दोन टाकी खराब झाली असून बाकी बुजलेली आहेत.
मंदिराच्या उजवीकडे काही उध्वस्त अवशेष आढळतात. काही ठिकाणी जुजबी तटबंदी शिल्लक आहे.  मंदिराच्या डाव्या हाताला ठेवून पुढे गेले की उजवीकडे वर जाणारी वाट दिसते.  इथून वर चढताना उजव्या बाजूला पाण्याची तीन प्रशस्त टाकी लागतात.  यापैकी एक बुजलेले असून बाकी शेवाळयुक्त  असले तरी पिण्यायोग्य आहे.  इथेच कोपर्‍यात मारुतीची उघडी मूर्ती आहे.  इथून तीच वाट घेऊन पुढे निघाले की आपण पडक्या बुरुज जवळ येतो.  डावीकडे छोटे मारुती मंदिर आहे.  पायर्यांनी वर गडमाथ्यावर जायचं इतकीच सुमारे पंधरा मिनिटात आटोपते.  माथ्यावर वाऱ्याने तयार झालेले दोन सुळके आहेत यातील निसर्गनिर्मित माणसाच्या आकाराचा दिसणारा पुतळा ही निसर्गाची केवळ अवर्णनीय कलाकृती.  हीच वरची सर्वात प्रेक्षणीय गोष्ट.  विविध दिशांतून विविध आकार व भास दाखवणारी ही कृती पाहून आपण अचंबित होतो.  इथून पुढे डोळ्यांना सुखावणारे कृष्णाचे छोटे देऊळ आहे.  खालचा वाडा रस्ता छान दिसतो या सगळ्यात एक गोष्ट मात्र मनाला खंतावून जाते मिळेल त्या ठिकाणी मंदिरांवर प्रस्तरांवर इतकेच काय पण पुतळ्यावरही लोकांनी आपली नावे बदनाम करून ठेवली आहेत.

गडावर जाण्याच्या वाटा:-

राहण्याची सोय:-  गडावर निवारा असा नाही शंकराच्या मंदिरात केवळ दोन माणसे राहू शकतात.

जेवणाची सोय:- खाण्याची सोय आपणच करावी पिण्याचे पाणी गडावर आहे.

पाण्याची सोय:-  बारमाही पाण्याची सोय आहे

जाण्यासाठी लागणारा वेळ:-  दोन तास.
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment