Kaldurg Fort (काळदुर्ग)

काळदुर्ग (Kaldurg Fort)
काळदुर्ग (Kaldurg Fort)
Height of the fort: - 1500 feet
Type of fort: - Giridurg
Mountain Range: - Palghar
District: - Thane
Category: - Medium

There are many hill forts in the Palghar section of Thane district. Because of the long distance from the urban area, Mumbai can be comfortably seen in a single day. These forts are on the border of Thane and Jawhar. There is a large number of tribals here because the forest is very much. All the neighborhoods are still in a backward state.

 Places to see on the fort: - It is not appropriate to call Kaladurg a fort. No sign can be seen in the fort. It seems to be a meeting place. The Gatemaatha is a square shaped piece of paper. Due to this crop, this fort is still visible in the long run. The area of ​​the fort is about half an acre. There is a big water tank on its lower plateau. A trunk is also found on the fort. The fort is divided into two stages: a highway and a lower plateau. There are two to three steps from the plateau to the ground. There is a water tank on the plateau. It can be used to keep an eye on the entire ferry from the fort.

 Places to go to the fort: -

1. Waghoba Khand: - From Mumbai to Virar via Palghar or from Kalyan, S.Thy should be brought to Palghar. Get a bus out of Palghar to get to Manor. Get down to the temple called the Wagoba. From here, the waiting distance goes to the fort. On the road going to the right of the temple, we can reach the fort. To remember the handpump. Hold the path leading up to the front of the footpipe. This path is further divided into three areas, leaving the left and right side of the distance. You can reach Kaladurga by going straight up.

Accommodation Facility:- There is no shelter on the fort.

Food Facility:- It is only for drinking purpose that drinking water is on the fort.

Water Facility: - It is possible to have perennial water.

Time to travel:- It takes two hours from the Wagoba pass.

Good duration to go:- It can go to all seasons.

किल्ल्याची उंची:- 1500 फूट
किल्ल्याचा प्रकार:- गिरीदुर्ग
डोंगररांग:- पालघर
जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहेत.  शहरी भागापासून फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना एका दिवसात आरामात पहाता येतात.  हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत.  जंगल खूप असल्याने येथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.  सर्व परिसर आजही मागासलेल्या अवस्थेत आहे.
 गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे:-  खरे पाहिले तर काळदुर्गला गड  म्हणणे योग्य नाही.  गड असल्याची कोणतीही खूण यावर नाही.  हे एक टेहळणीचे  स्थान असावे असे वाटते.  गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडा होय.  या कातळामुळे हा गड लांब असूनही नजरेत येतो.  गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे.  त्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे.  गडावर एक  कुंड देखील आढळते.  किल्ला दोन स्तरात विभागला आहे एक गडमाथा  आणि खालचे पठार.  पठारावरून  गडमाथ्यावर  जाण्यास दोन ते तीन पायऱ्या आहेत.  पठारावर पाण्याचे एक टाके आहे किल्ल्यावरून संपूर्ण घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.
 गडावर जाण्याच्या वाटा:-
१.  वाघोबा खिंड:- मुंबईहून विरार मार्गे पालघर गाठावे अथवा कल्याण वरून एस ती ने  पालघर ला जावे. पालघर वरून  मनोरे ला जाणारी बस पकडावी. वाघोबा  नावाच्या देवालयाचा थांब्यावर उतरावे.  येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते .  देवळाच्या उजवीकडे जाणार्‍या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. हातपंप हि खून लक्षात ठेवणे. हातपंपाच्या समोरून वर जाणारी वाट पकडावी.  ही वाट पुढे तीन भागात विभागली जाते डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी. सरळ वर जाणार्‍या वाटेने काळदुर्ग गाठता येते.
राहण्याची सोय:-  गडावर निवारा असा नाही.
जेवणाची सोय:-  खाण्याची सोय आपणच करावी पिण्याचे पाणी गडावर आहे.
पाण्याची सोय:-  बारमाही  पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ:-  वाघोबा खिंडीतून दोन तास लागतात.
जाण्यासाठी उत्तम कालावधी:- सर्व ऋतुत जाता येते.

SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment