Arnala Fort (अर्नाळा)

Arnala Fort (अर्नाळा)
 Arnala Fort (अर्नाळा)
The height of the fort: - Types of fort: - Forts on the seashore Mountain Range: - North Konkan District: - Thane Category: - Simple
The fort fort is built on the northwestern side of the small island Arnala. Since the Vaitarna river in North Konkan is near the sea near the fort, all the areas of the creek are from this fort. It could be kept watching.  History: - Arnala Jaladurga, surrounded by water on four sides, built in 1561 by Sultan Mahmud Begada of Gujarat. The Portuguese conquered this fort in 1530 and made many new constructions on it. After two hundred years of Portuguese rule, the fort was captured by the Marathas in 1737. Like the Portuguese, Bajirao also rebuilt this fort. In 1817, this fort was also captured by the British.
Places to see on the fort: - The Arnala Fort is protected by a square and a ten-meter high and a strong fortification. The fortified bastions are still standing today. Although there are three doors in the fort, the main entrance is north of it. There are two arched bastions on both sides of this entrance. The door is beautifully decorated with an image of elephant and tiger. There is an inscription on the door. Bajirao Amatya, the main consonant of this inscription, is the king of Shankar! Pushchatyas Vandhini Sindhu Udari Bandha fast ki janjira !! From this line it shows that the fort was rebuilt by Bajirao Peshwa. Within the fort there is a temple of Trimbakeshwar and Bhavani Mata. There is an octagonal oasis in front of Trimbakeshwar Mahadev temple. Besides this, there are freshwater wells in the fort. The surroundings of the fort are inhabited by people and they also have their farming. On the way to the main entrance to the fort, there is a temple of Kalimata on the outskirts. When the fort is seen from the beach, a round tower can draw its attention from the fort at the left hand side. There is a small door to go in. It takes half an hour to thirty hours to see the entire fort. From the strong walls of the fort, there is a round-the-clock knock on the fort from the fort. While sitting on the top of the main entrance, the entire fort is visible.

 How to reach the fort: - Arnala is about 10 kms away from Virar in Western Railway. There is a facility of ST bus and autorickshaw to get there. After going to the beach from Arnala village, it can be reached by boat only. These boats are taken from 6.00 am to noon 12.30 pm and in the evening from 4.00 pm to 7.00 pm, you can take them to the fort. It takes 5-10 minutes for the boat to reach Arnala Fort, opposite to the beach.

Accommodation Facility:- There is no lodging facility on the fort, but the entire fort is not able to stay in the half-quarters hour after returning to the coast.
Dining facilities: - There is no lodging facility on the fort. Take it with meals. Water Facility:- There are freshwater wells on the fort. Time to go: - From one hour to Virar.
============================================================================ किल्ल्याची उंची:- किल्ल्याचा प्रकार:- सागर किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग:- उत्तर कोकण जिल्हा:- ठाणे श्रेणी:- सोपी अर्नाळा नावाच्या लहानशा बेटाच्या वायव्य दिशेस हा जलदुर्ग किल्ला बांधला आहे. उत्तर कोकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्राला मिळत असल्यामुळे खाडीच्या सर्वच प्रदेशावर या पाणकोटावरुननजर ठेवता येत असे.
इतिहास:- चारही बाजूंनी पाण्याने वेढलेला अर्नाळा जलदुर्ग 1561 मध्ये गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने बांधला. पोर्तुगीजांनी 1530 सालि हा किल्ला जिंकला व नंतर यावर अनेक नवीन बांधकामे केली. सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला 1737 मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला. पोर्तुगीजांनी प्रमाणेच पहिल्या बाजीरावानेही या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. शेवटी 1817 मध्ये हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे: - अर्नाळा किल्ला चौकोनी असून दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी याचे संरक्षण करते. तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ताठपणे उभे आहेत. किल्ल्याला एकूण तीन दरवाजे असले तरी मुख्य प्रवेश द्वार उत्तरेकडे आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दोन बुलंद बुरुज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूला हत्ती व वाघाची प्रतिमा कोरलेली आहे. दरवाजावरच एक शिलालेख कोरलेला आहे. या शिलालेखामधील बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!! या ओळींवरून या किल्ल्याची पुनर्बांधणी बाजीराव पेशव्यांनी केली हे लक्षात येते. किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वर व भवानी मातेचे मंदिर आहे. त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरासमोरच सुबक बांधणीचे एक अष्टकोनी तळ आहे. या शिवाय किल्ल्यात गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. किल्ल्याच्या सभोवार लोकांची वस्ती असून त्यांची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जातांना बाहेरच्या बाजूला कालीमातेचे मंदिर आहे. समुद्रकिनाऱ्यावरून किल्ल्याकडे पाहिले असता डाव्या बाजूला असणाऱ्या किल्ल्यापासून संपूर्ण सुटा असा एक गोल बुरुज आपले लक्ष वेधून घेतो. याच्या आत जाण्यास एक लहानसा दरवाजा आहे. संपूर्ण किल्ला बघण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरुन किल्ल्याचे सभोवार दर्शन घेत गोल फेरी मारता येते. मुख्य प्रवेशद्वाराच्या वर असणार्‍या उंचवट्यावर बसले असता संपूर्ण किल्ल्याचा आवाका नजरेस पडतो. गडावर जाण्याच्या वाटा:- पश्चिम रेल्वेच्या विरार पासून अर्नाळा अंदाजे 10 किलोमीटरवर आहे. तेथे जायला एसटी बस व रिक्षा यांची सुविधा आहे. अर्नाळा गावातून समुद्रकिनार्‍यापर्यंत गेल्यावर बोटीनेच किल्ल्यावर जाता येते. ही बोट सकाळी 6.00 ते दुपारी 12.30 व संध्याकाळी 4.00 ते 7.00 या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. समुद्रकिनाऱ्यावरून समोरच दिसणार्‍या अर्नाळा किल्ल्यावर बोटीने जायला 5-10 मिनिटे लागतात. राहण्याची सोय:- गडावर राहण्याची सोय नसली तरी संपूर्ण गड अर्धा पाऊण तासात बघून बोटीने किनाऱ्यावर परतता येत असल्याने राहण्याची गरज नाही. जेवणाची सोय:- गडावर जेवणाची सोय नाही. जेवण बरोबर घेऊन जावे. पाण्याची सोय:- गडावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत.
जाण्यासाठी लागणारा वेळ:- एक तास विरार पासून.


SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment