AAjobagad Fort (आजोबागड)

 AAjobagad Fort (आजोबागड)
 AAjobagad Fort (आजोबागड)
The height of the fort: -
Type of fort: - Giridurg
Mountain Range: -
District: - Thane
Category: - Medium

Around the middle of Ratangad and Harishchandragada in the range of Balaghat, a mountain of grandfather may seem like an ancient man. This great granddaughter, which is full of dense vegetation, has become a unique target for the climbers. This fort is three thousand feet tall, and it is a big challenge for street lords.

History: - A mythology is famous on the name of the cast of the fort. Sitting on this fort, Valmiki Rishi wrote the Ramayana script. On this fort, Sitamai gave birth to Love and Kush and Kush Valmiki was called a grandfather so that the name of this fort was called grandfather. There is also Valmiki Rishi's ashram and his samadhi on the fort.

 Places to see on the fort: - After reaching the first fortnight, reaching the Valmiki Rishi's ashram, we have to reach the half-hour of Valmiki Rishi's ashram and do not have to wait to go to the head of the fort. There is a hut to stay on the fort. If there is a concession program, then there is a need for food to be taken out of the house. After ascending by the waterfall near the ashram, there is a cave after about one to one and a half hour, the idols of Parvukta are engraved in the rock. There is also a water tank on the left here. Iron rods have been set up to reach this cave and return to the Ashram in this way. In this way grandfather's fortresses from Mumbai come to be a natural destination. There is nothing special to see if leaving two to three water cisterns on the head of the fort. Many durgivir Ratangad - grandfather of grandfather - Harishchandragad

How to reach the fort: - The direct and easiest way to reach the Asangaon railway station from Mumbai is to reach Asangaon railway station from Mumbai. From this place, in the city of Shahapur, come the rakes or ST. ST from here The jeep or the jeep should come to the village of Dane, through the eye of the eye. There is a plateau when going through the village. Three parts come together on the plateau, the way a bullock cart is taken directly to the Valmiki Rishi's ashram. The second route goes to the hill of Kotrabai and later goes to Kumshet village. The third way, however, is not going well with the way to the forest.

Kalyan - Murbad-Malsege- Dokhkhamb: - By this way Kalyan Murbad Malseus can also reach Dena village. Kasara - Ghoti - Rajur - Kumetsh Marg: - It is possible to see the fort of the fort.

 Accommodation Facility: - There are three people who can live in the ashram to stay on the fort.

 Food Facility:- You can bring food items yourself, because there is no food facility here.

Water Facility:- There is a continual stream of twelve months of continuous flow.

Time to go:- One hour.

 Suggestions:- It is necessary to take proper care because the snakes are very much in the fort

किल्ल्याची उंची:-
 किल्ल्याचा प्रकार:- गिरिदुर्ग
डोंगररांग:-
 जिल्हा:- ठाणे
श्रेणी:- मध्यम
बालाघाटाच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगडा यांच्या मधोमध अगदी कडेला असलेला आजापर्वत उर्फ आजोबाचा डोंगर एखाद्या पुराण पुरुषाप्रमाणे भासतो.  घनदाट झाडाझुडुपांनी नटलेला हा आजोबाचा गड गिर्यारोहकांसाठी एक आगळे वेगळे लक्षच ठरला आहे.  या गडाची तीन हजार फुटांची भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक मोठे आव्हान आहे.
इतिहास:- गडाचे नाव आजोबा कसे पडले यावर एक पुराणकथा प्रसिद्ध आहे.  याच गडावर बसून वाल्मिकी ऋषींनी रामायण हा धर्मग्रंथ लिहिला.  याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला आणि कुश वाल्मिकी ऋषींना आजोबा म्हणत असत म्हणूनच या गडाचे नाव आजोबा असे पडले अशी कथा सांगितली जाते.  येथे गडावर वाल्मिकि ऋषीचा आश्रम व त्यांची समाधीसुद्धा आहे.
 गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे:-  पहिली वाट पकडून वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी साधारणतः अर्ध्या तासात पोहचावे वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो.  येथे गडावर राहण्यासाठी एक कुटी  आहे.  जवळच पाण्याचा झरा आहे जर मुक्कामाचा कार्यक्रम असेल तर जेवणाची सोय आपल्याला घरूनच करून आणावी लागते.  आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने चढत गेल्यास सुमारे एक ते दीड तासानंतर एक गुहा लागते येथे लवकुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत.  येथे डावीकडे एक पाण्याचे टाके सुद्धा आहे.  या  गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्या देखील लावल्या आहेत याच मार्गाने आश्रमात परतावे.  अशाप्रकारे मुंबईहून येणार्‍यांसाठी आजोबाचा गड एक निसर्गरम्य दुर्गयात्राच ठरते.  गडाच्या माथ्यावर दोन ते तीन पाण्याची टाकी सोडल्यास पहाण्याजोगे विशेष काहीच नाही.  अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा ते पाच दिवसांचा टेक करतात.
गडावर जाण्याच्या वाटा:- मुंबईहून आसनगाव रेल्वे स्थानकावर गडावर जाण्याचा सरळ आणि सोपा मार्ग म्हणजे मुंबईहून आसनगाव  रेल्वे स्थानकावर यावे.  येथून शहापूर या गावी रिक्षेने अथवा एसटीने यावे. येथून पहाटेच एस.टी . ने अथवा जीप ने  डोळखांब साकुर्ली  मार्गे डेणे या गावी यावे.  गावातून जाताना मध्ये एक पठार लागते पठारावर तीन वाटा एकत्र येतात यातील एक बैलगाडीची वाट सरळ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापाशी घेऊन जाते.  दुसरी वाट कात्राबाईच्या डोंगरात जाते आणि पुढे कुमशेत  गावात जाऊन मिळते.  तिसरी वाट मात्र जंगलात जाते या वाटेने न जाणेच श्रेयस्कर.
कल्याण - मुरबाड- माळशेज- डोळखांब:-  या मार्गाने कल्याण मुरबाड माळशेज या मार्गाने सुद्धा डेणे गावी पोहचता येते.  कसारा - घोटी -राजूर -कुमशेत मार्ग :- गडाचा माथा पाहण्यासाठी या  मार्गे जाता येते.
 राहण्याची सोय:-  गडावरती रहाण्यासाठी आश्रम आहे या तेवीस जणांना राहता येते.
 जेवणाची सोय:-  येथे जेवणाची सोय नसल्याने जेवणाचे साहित्य आपण स्वतः घेऊन यावे.
 पाण्याची सोय:- येथे बारामाही पाण्याचा झरा सतत वाहत असतो.
 जाण्यासाठी लागणारा वेळ:- एक तास.
 सूचना:-  गडावर सापांचे फार वास्तव्य असल्याने योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे
SHARE
  • Image
  • Image
  • Image
  • Image
  • Image
    Blogger Comment
    Facebook Comment